चेन्नई : ‘तुमचा आयफोन हुंडीत पडला. तो आता देवाचा झाला. परत मिळणार नाही…,’ तमिळनाडूतील एका मंदिर प्रशासनाने दिलेल्या उत्तराने संबंधित भाविकाला भोवळ येण्याची वेळ आली. (iPhone)
चेन्नईजवळील थिरुपुरूर येथील अरुल्मिगु कंदास्वामी मंदिरात ही घटना घडली. हुंडीत दान टाकताना अनवधानाने आयफोन टाकल्याचे संबंधित भक्ताने सांगितले आणि फोन परत देण्याची विनंती केली. मात्र हुंडीत पडलेली प्रत्येक दान देवाची मालमत्ता होते. त्यामुळे आयफोन परत मिळणार नाही, असे भक्ताला सांगण्यात आले.
विनयगापुरम येथील भक्त दिनेश यांना या अनुभवाला सामोरे जावे लागले. फोन देण्यास नकार मिळाल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. मंदिर व्यवस्थापनाने त्यांना सिमकार्ड देण्याची आणि फोनवरून डेटा डाउनलोड करण्याची परवानगी देऊ असे सांगितले. मात्र फोन मिळणार नाही, असे ठामपणे सांगितले. (iPhone)
दिनेश महिनाभरापूर्वी कुटुंबासह मंदिरात गेले होते. पूजेनंतर हुंडीत पैसे दान टाकण्यासाठी गेले होते. त्यांनी सांगितले की, शर्टाच्या खिशातून नोटा काढत असताना चुकून त्यांचा आयफोन हुंडीत पडला. हुंडी उंचीवर ठेवल्याने ते फोन परत घेऊ शकले नाहीत. घाबरलेल्या दिनेश यांनी मंदिर प्रशासनाकडे धाव घेतली.
तथापि, त्यांनी एकदा हुंडीत अर्पण केल्यानंतर ती देवाची मालमत्ता मानली जाते. ती परत करता येत नाही. परंपरेनुसार दोन महिन्यातून एकदाच हुंडी उघडली जाते. (iPhone)
या घटनेनंतर, दिनेशने हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. हुंडी कधी उघडणार, याची माहिती देण्याची विनंती केली. हुंडी शुक्रवारी (दि. २०) उघडण्यात येणार होती. त्यानुसार दिनेश धावतपळत मंदिरात गेले. आयफोन परत द्यावा म्हणून त्यांनी परत विनंती केली. मात्र तो देण्यास मंदिर प्रशासनाने नकार दिला.
मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी सांगितले की, हुंडीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू मंदिर आणि देवतेची आहे असे मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे फोन मंदिराच्या ताब्यात ठेवला जाईल.
iPhone accidentally fell into the temple’s hundi..
The temple administration refused to return it the owner, saying it belonged to the temple.pic.twitter.com/4VgfcRk0Ib
— Vije (@vijeshetty) December 20, 2024
हेही वाचा :