महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवू़डमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या विक्रांत मेसीने अचानक अभिनयातून निवृत होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनयातून निवृत्ती घेणार असल्याचा निर्णय त्याने सोशल मीडियावर जाहीर केला. यावेळी त्याने अभिनयातून निवृत्ती घेण्यामागे त्याने खासगी कारण दिले आहे. विक्रांतने काल (दि.१) सकाळी आपण २०२५ नंतर अभिनयातून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सांगितले. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्याने लिहले आहे की,”गेले काही वर्ष माझ्यासाठी अद्भुत राहिली आहेत. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला. पण, जसे मी पुढे गेलो, तेव्हा मला अनुभव आला की, एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणून …घरी परतण्याची वेळ आली आले.”
ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने अचानक घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘द साबरमती रिपोर्ट’ सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील त्याची भूमिका गाजली होती. याआधी तो ‘१२वीं फेल’, ‘सेक्टर ३६’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. उत्तम अभिनयासाठी विक्रांतचे नेहमीच कौतुक होते.