महाराष्ट्र दिनमान डेस्क : बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला ऑटो रिक्षाने लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. सैफ अलीला ऑटो रिक्षातून का नेले? याचा तपासही पोलिस करत आहेत. (Saif Ali )
सैल अली खानवर मध्यरात्री अडीच वाजता हल्ला झाला. त्यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याने लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करताना सैफ स्वत:च्या कारमधून न जाता ऑटो रिक्षातून जखमी अवस्थेत त्याला नेण्यात आले.
‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री ड्रायव्हर हजर नसल्याने त्याला रिक्षाने नेण्यात आले. ‘बबल रिपोर्ट’नुसार सैफ अली खान रक्तबंबाळ झाला होता. त्यासंबंधी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ऑटो रिक्षामध्ये जखमी सैफ सोबत त्याची पत्नी करीना गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. पण या व्हिडिओची खात्री झालेली नाही.(Saif Ali )
‘हिंदूस्थान टाइम्स’ने पोलीस सूत्रानुसार माहिती दिली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजता सैफ लिलावती हॉस्पिटलमध्ये आला. घरी ड्रायव्हर नसल्याने त्याला ऑटो रिक्षातून न्यावे लागले. या घटनेने बॉलीवूड सुन्न झाले. लिलावती हॉस्पिटलमध्ये त्याला पाहण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. संजय दत्त, करिश्मा कपूर, मलाईका अरोरा, कुणाल खेमू, करण जौहर, सिध्दार्थ आनंद यांनी सैफच्या घरी भेट दिली आहे.(Saif Ali )
हल्ल्याच्या घटनेनंतर बॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पूजा भट्ट, इम्तियाज अली आणि ज्युनिअर ‘एनटीआर’ने सैफच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. रवीना टंडन मोठी पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने असे म्हटले आहे की सेलिब्रिटीजना टार्गेट करणे सोपे झाले आहे. कारण ते सॉफ्ट टार्गेट आहेत. मुंबईच्या सुरक्षेवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता बांद्रा सुरक्षित राहिलेले नाही, असेही तिने म्हटले आहे.
हेही वाचा :
कोटीच्या खंडणीसाठी हल्ला