मुंबई : यू ट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये केलेल्या आक्षेपार्ह टिपणीबद्दल जाहीर माफी मागितली आहे. ‘माझी टिपणी योग्य नव्हती आणि ती विनोदीही नव्हती, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे,’ असे त्याने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Ranveer apologis)
या शोमध्ये सहभागी स्पर्धकाला रणवीरने आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर लोकांनी टीकेची झोड उठवली. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मीम्सही सुरू झाले. त्यानंतर रणवीरने माफी मागितली. दरम्यान, रणवीर याच्यासह सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर अपूर्व मखिजा, कॉमेडियन समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोग या दोघांकडे नोंदवलेल्या तक्रारीत शोमध्ये अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Ranveer apologis)
रणवीरने माफी मागताना पोस्टवर म्हटले आहे की, सर्व वयोगटातील पॉडकास्ट लोकांनी पाहिले. मी कुटुंबाचा कधीही अनादर करणार नाही. यापुढे जबाबदारीने वागेन, कुणाचाही अनादर होईल, असे वक्तव्य करणार नाही. या प्लॅटफॉर्मचा अधिक चांगला वापर करण्याची गरज आहे. या संपूर्ण अनुभवातून मी शिकलो आहे. मी फक्त चांगले होण्याचे वचन देतो. व्हिडिओच्या निर्मात्यांना व्हिडिओमधून असंवेदनशील विभाग काढून टाकण्यास सांगितले आहे.
‘मी शेवटी एवढेच सांगू शकतो की माफ करा. एक माणूस म्हणून तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे,’ याचा पुनरुच्चार त्याने केला आहे.
कारवाई व्हायला हवी : मुख्यमंत्री
रणवीर अलाहाबादियाने शो दरम्यान केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत. ते कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचे आहे. असे काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘या शोदरम्यान खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असे समजले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपते आणि असे करणे अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत.’ (Ranveer apologis)
आक्षेपार्ह भाग हटवण्याचे आदेश
दरम्यान, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सोमवारी यू ट्यूबला महिला आणि मुलांबद्दल कथित आक्षेपार्ह, अयोग्य आणि अश्लील टिप्पण्यांसाठी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शीर्षकाच्या शोचा भाग/व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले.
यू ट्यूबच्या पब्लिक पॉलिसी हेड मीरा चट यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, त्यांनी म्हटले आहे की, आयोगाला एक तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामध्ये समय रैनाने होस्ट केलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नावाच्या शोमध्ये समाजाविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह, अयोग्य आणि अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
#WATCH | Mumbai: On controversy over YouTuber Ranveer Allahbadia’s remarks on a show, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “I have come to know about it. I have not seen it yet. Things have been said and presented in a wrong way. Everyone has freedom of speech but our freedom… pic.twitter.com/yXKcaWJWDD
— ANI (@ANI) February 10, 2025
हेही वाचा :