महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी सभागृहात गदारोळ घातल्याने कामकाज उद्यापर्यंत (दि. ११) तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विरोधी खासदारांनी विविध मुद्दे मांडण्याची मागणी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये गदारोळ झाला. तर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Parliament Winter Session)
यावर बोलताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधींना विविध विषयांवर नाटक करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायला आवडते. त्यांना नाटक करायला आणि परदेशात सुट्टीचा आनंद घ्यायला जमते. अशी टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहूल गांधींवर केली. पुढे ते म्हणाले की, काँग्रेस नेते जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही.
हेही वाचा :