नवी दिल्ली : अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने तयार केलेले दृष्टी १० स्टारलाइनर ड्रोन पोरबंदर किनारपट्टीवर क्रॅश झाले. भारतीय नौदलासाठी ते बनवण्यात आले आहे. त्याच्या चाचण्या सुरू होत्या. त्यादरम्यानच ते क्रॅश झाले. या प्रणालीची किंमत १४५ कोटी आहे. (Drone Crash)
सर्व हवामानात काम करणारे हे ड्रोन ७० टक्के स्वदेशी आहे. ते ३६ तास चालू शकते आणि त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता ४५० किलो इतकी आहे.
मध्यम-उंचीचे लाँग-एंड्युरन्स ड्रोन नौदलाच्या सेवेत आधीपासूनच आहे. ते गेल्या वर्षी समाविष्ट करण्यात आले आहे. पण त्याची क्षमता आता वाढवण्यात आली आहे. क्रॅश झालेले ड्रोन उत्पादक कंपनीच्यावतीने ऑपरेट करण्यात आले होते. ते सापडले आहे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले.(Drone Crash)
दृष्टी १० स्टारलाइनर हे अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने इस्रायली संरक्षण फर्म एल्बिट सिस्टम्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणासह तयार केले आहे. हैदराबाद येथे ते तयार करण्यात आले आहे. ते ड्रोन ‘अदानी’द्वारे भारतीय सैन्याला देण्यात येणारे पहिला मोठा संरक्षणविषयक प्लॅटफॉर्म आहे. ते हे एल्बिट सिस्टम्सच्या हर्मीस ९०० स्टारलाइनर ड्रोनचा एक प्रकार आहे.
हेही वाचा :