बेंगळुरू : मुंबई संघाने आज (दि.१५) सईद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेडगेच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशला ५ विकेट आणि १३ चेंडू राखून हरवले. मुंबईने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. (Mushtaq Ali Trophy)
विजेतेपदासाठी १७५ धावांचा पाठलाग करताना मुंबईने पॉवर-प्लेमध्ये २ विकेट गमावल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर झटपट बाद झाले. त्यानंतर, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी रचून मुंबईचा डाव सावरला. व्यंकटेश अय्यरने रहाणेला बाद करून ही जोडी फोडली. रहाणेने ३० चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ३७ धावा केल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात सूर्यकुमारही बाद झाला त्याने ३५ चेंडूंमध्ये ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावा फटकावल्या. त्यानंतर, शिवम दुबे केवळ ९ धावाच करू शकला. मात्र, सूर्यांश शेडगने अथर्व अंकोलेकरच्या साथीने अवघ्या १९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी रचून मुंबईचा विजय साकारला. शेडगेने १५ चेंडूंत नाबाद ३६ धावा ठोकताना प्रत्येकी ३ चौकार व षटकार लगावले. (Mushtaq Ali Trophy)
तत्पूर्वी, या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत नवव्या षटकाअखेर मध्य प्रदेशची अवस्था ४ बाद ५४ अशी केली होती. मात्र, रजत पाटीदारने कर्णधारास साजेशी खेळी करत एकहाती मध्य प्रदेशला पावणेदोनशे धावांच्या आसपास पोहचवले. पाटीदारने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ४० चेंडूंत प्रत्येकी ६ चौकार व षटकारांच्या मदतीने नाबाद ८१ धावांची खेळी केली. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि रॉयस्टन डियास यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. (Mushtaq Ali Trophy)
𝐓𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐭𝐢𝐦𝐞 𝐰𝐚𝐬 𝐬𝐨 𝐧𝐢𝐜𝐞, 𝐰𝐞 𝐡𝐚𝐝 𝐭𝐨 𝐝𝐨 𝐢𝐭 𝐭𝐰𝐢𝐜𝐞. 🏆
Congratulations to Shreyas Iyer & Co on claiming the Syed Mushtaq Ali Trophy for the second time. ✌️#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/2K4zHb9x16
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 15, 2024
हेही वाचा :