महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू ही पोलिसांकडून झालेली हत्याच आहे. पोलिसांनीच कोठडीत त्याची हत्या केली आणि तो दलित असल्यामुळेच ही हत्या करण्यात आली, आरोप गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी परभणीतील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी आज (दि. २३) भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले, ‘मी सोमनाथच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिडिओ, छायाचित्रे दाखवली. त्याची हत्या झाली असून पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले. या तरुणाची हत्या करण्यात आली. कारण तो दलित होता आणि संविधानाचे रक्षण करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही राज्यघटना नष्ट करण्याची आहे. हे प्रकरण तत्काळ तडीस लागले पाहिजे. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी त्यांची हत्या केली त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.’
या घटनेचे कोणतेही राजकारण आम्ही करत नाही असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याशी बोलताना सूर्यवंशी कुटुंबीय भावूक झाले होते. यावेळी सोमनाथ यांच्या आईने माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली. (Rahul Gandhi)
यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदींचे उपस्थिती होती.
नक्की घटना काय ?
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्याजवळील संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरूने विटंबना केली होती. यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. यावेळी जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली. या घटनेनंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात सोमनाथ यांचाही समावेश होता. सोमनाथ यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत. (Rahul Gandhi)
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
परभणीत राहुल गांधी येणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मैं परभणी में हिंसा पी़ड़ित परिवार से मिला हूं, इसके साथ ही मैं उनसे भी मिला हूं, जिन्हें मारा-पीटा गया है।
मुझे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फोटोग्राफ और वीडियो दिखाया गया। ये पूरी तरह से Custodial death है। पुलिस ने युवक की हत्या की है।
ये मर्डर है।
वहीं CM ने पुलिसवालों को मैसेज… pic.twitter.com/pXlzJuf3Mx
— Congress (@INCIndia) December 23, 2024
हेही वाचा :