महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : परभणीतील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या घरी आज (दि.२३) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भेट दिली. राहुल गांधीशीं बोलताना सुर्यवंशी कुटुंबीय भावूक झाले होते. यावेळी सोमनाथच्या आईने माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली. (Rahul Gandhi)
यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चंनिथल्ला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदींचे उपस्थिती होती.
नक्की घटना काय ?
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्याजवळ असलेल्या संविधानच्या प्रतीची एका माथेफिरीने विटंबना केली होती. यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. यावेळी जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली. या घटनेनंतर आंदोलकांना ताब्यात घेतले. यात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोकाचा समावेश होता. परंतु, सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत. (Rahul Gandhi)
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
परभणीत राहुल गांधी येणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मैं परभणी में हिंसा पी़ड़ित परिवार से मिला हूं, इसके साथ ही मैं उनसे भी मिला हूं, जिन्हें मारा-पीटा गया है।
मुझे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, फोटोग्राफ और वीडियो दिखाया गया। ये पूरी तरह से Custodial death है। पुलिस ने युवक की हत्या की है।
ये मर्डर है।
वहीं CM ने पुलिसवालों को मैसेज… pic.twitter.com/pXlzJuf3Mx
— Congress (@INCIndia) December 23, 2024
हेही वाचा :