महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे आज (दि.५) उपमुख्यंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नसतील. तर, आम्ही शपथ घेवून काय करू?. त्यांनी शपथ घ्यावी अशी शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे. अशी भावना उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. परंतु, आता महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर, उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Eknath Shinde)
पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेच्या सर्व नेत्यांची इच्छा आहे. आज ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ नाही घेतली, तर आम्ही कोणीही मंत्री पदाची शपथ घेणार नाही. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे व्हावेत ही आमची भूमिका आहे. शिवसेनेच्या आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री होणार नाही. शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे, ही आमची मागणी आहे आणि ते होतील, असे सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा :