महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : टेनिसचा बादशाह राफेल नदालने आज (दि.१०) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कपमधून तो निवृत्ती घेणार आहे. २०२३ मध्ये राफेलने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे टेनिस चाहत्यांची निराशा झाली आहे. (Rafael Nadal)
आपल्या टेनिसमधून निवृत्तीची घोषणा एक्सवर पोस्टवर केली आहेत. यामध्ये त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. राफेलने आपल्या कारकिर्दीत २२ ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावली आहेत.
नफालने २० वय होण्याअगोदर १३ जेतेपदं पटकावली होती. २००८च्या विम्बंल्डनच्या फायनलमध्ये त्याने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचा पराभव केला होता. या विजयानंतर त्याने २ ००९ व २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. यानंतर २०१० मध्ये त्याने पुन्हा विम्बंल्डनचे जेतेपद पटकावले. २०१०, २०१३, २०१७ व २०१९ अशी चारवेळा राफेलने अमेरिकन ओपनची जेतेपदे पटकावली आहेत. सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूत तो दुसऱ्या स्थानावर आहे. (Rafael Nadal)
‘नदाल’ फ्रेंच ओपनचा बादशहा
टेनिसपटू राफेल नदलला फ्रेंच ओपनचा ‘बादशहा’ मानले जाते. राफेलने फ्रेंच ओपनचे कोर्ट १२ वेळा जिंकले आहे. फ्रेंच ओपनसह नदालने ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डनचे प्रत्येकी दोनवेळा विजेतेपद पटकावले आहे. यासह त्याने अमेरिकेन ओपन ग्रँडस्लॅमवर चारवेळा आपले नाव कोरले आहे. २००८ आणि २०१६ च्या ऑलिम्पिकमधील टेनिस दुहेरीत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. २००४, २००९ आणि २०११ आणि २०१९ मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या संघात त्याचा समावेश होता.
नोव्हेंबरमध्ये करणार टेनिसला अलविदा
नदालने जाहीर केल्यानुसार तो डेव्हिस कपच्या फायनलमध्ये टेनिसला अलविदा करणार आहे. यानंतर तो व्यावसायिक टेनिसचा निरोप घेणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान डेव्हिस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. २००४ साली झालेल्या डेव्हिस कपमध्ये नदालने स्पेन विजयी करण्यात महत्पाची भूमिका बजावली होती. या कामगिरीचा उल्लेख त्याने आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे.
Tennis icon Rafael Nadal announces retirement from professional Tennis. pic.twitter.com/hs3u2aBe9i
— ANI (@ANI) October 10, 2024
हेही वाचा :