महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या बरोबरीत आहे. भारताचा फिरकीपटू अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी तनुष कोटियनचा समावेश केला आहे. कोण आहे तनुष कोटियन जाणून घेवूयात त्याच्याबद्दल… (Tanush Kotian)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पणाची संधी ?
भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने गाब्बा कसोटी (तिसरा सामना) संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत युवा अष्टपैलू तनुष कोटियनचा संघात समावेश केला. गुरुवारपासून (दि.२६) सुरू होणाऱ्या मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा त्याला पदार्पणाची संधी देईल, अशी अपेक्षा आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईत संघाचा तनुष भाग होता. या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या नऊ सामन्यांत त्याने एकूण नऊ बळी घेतले. यापूर्वी त्याने मुंबईला ४२ वे रणजी विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Tanush Kotian)
तनुषची चमकदार कारकीर्द
२६ वर्षीय अष्टपैलू आतापर्यंतची देशांतर्गत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ३३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३.३१ च्या इकॉनॉमी रेटने १०१ बळी घेतले आहेत. याशिवाय २१ लिस्ट ए आणि ३३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे २२ आणि ३३ विकेट घेतल्या. त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतके आणि १३ अर्धशतकांसह १५२५ धावा आहेत.
हेही वाचा :