कोल्हापूर; प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे दिला जाणारा “छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष पुरस्कार २०२४” शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे २५ डिसेंबर रोजी होणार आहे, तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षामध्ये या पुस्तकास तिसरा साहित्य पुरस्कार मिळत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या १८० ग्रंथांचा परिचय डॉ. पवारांनी या ग्रंथात करून दिला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे एकूण सहा ग्रंथ डॉ. पवार यांनी लिहिले आहेत.डॉ. पवार यांनी आतापर्यंत ३० ग्रंथांचे लेखन व संपादन केले असून त्यापैकी १६ पुस्तकांना जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा :