कोल्हापूर; प्रतिनिधी : खुल्या कारागृहासाठी गुरे राखण्याचे काम खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या कैद्याला मिळाली. गुरे राखत असताना शौचालयाचे कारण सांगून कैदी पळून गेल्याची घटना कळंबा कारागृहाच्या बंधारा शेती आवारात घडली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Kolhapur)
धुळे जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी वजीर नानसिंग बारेला याला २०१८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. १८ जुलै २०२४ पर्यत कैदी बारेला नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयात शिक्षा भोगत होता. त्यानंतर त्याची रवानगी कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाकडे करण्यात आली. वजीर बारेला याची खुल्या कारागृहासाठी निवड असल्याने कारागृहाबाहेरील बंधारा शेती विभागात त्याला काम दिले होते.
आज (दि.२०) सकाळी वजीर बारेला गुरे राखत होता. त्याचा सहकारी कैदी विजय नाईकही त्याच्या सोबत होता. पावनेबारा वाजण्यास सुमारास कैदी बारेला त्याचा सहकारी कैदी विजय नाईकला सांगून शौचालयाला गेला. पंधरा मिनिटे होऊनही शौचालयासाठी गेलेला बारेला न आल्याने कैदी विजय नाईकने शोध घेतला. त्यानंतर कैदी नाईकने याने बंदोबस्तावर असलेला शिपाई धीरज बळीराम शिंदे याला कैदी वजीर बारेला मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर शिपायांनी शोध घेत असताना वजीर बारेला मिळून आला नाही. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनाने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Kolhapur)
हेही वाचा :