नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटलींचे सुपुत्र रोहन हे दिल्ली क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी पुन्हा निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा पराभव केला. ३५ वर्षीय रोहन यांना १,५७७ मते, तर आझाद यांना ७७७ मते मिळाली. (Rohan Jaitley)
अरुण जेटली यांनीही डीडीसीएचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर २०२० मध्ये रोहन प्रथमत: बिनविरोध डीडीसीएचे अध्यक्ष बनले. त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी विकास सिंह यांचा पराभव करून पुन्हा अध्यक्षपद मिळवले होते. दरम्यान, डीडीसीए कार्यकारिणी निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदासाठी शिखा कुमार या निवडून आल्या. त्या बीसीसीआयचे माजी प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या कन्या आहेत. अशोक शर्मा हे सरचिटणीस, तर हरीश सिंगला हे खजिनदारपदी निवडून आले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आझाद यांनी डीडीसीएमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य असणारे आझाद हे सध्या तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार आहेत. (Rohan Jaitley)
हेही वाचा :