वॉशिंग्टन : तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीत विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सुनीता विल्यसम्स यांच्यासोबत क्रू मेंबर बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन कॉसमोनॉट अलेक्झांडर गोर्बुनाव्हा हेही पृथ्वीवर परतणार आहेत. क्रू नाऊन मिशन आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ५७ मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर कोसळणार आहे, असे नासाने जाहीर केले आहे. (Sunita returns)
आज मंगळवारी सकाळी भारतीय वेळेनुसार साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकवरुन पृथ्वीकडे येण्यास निघाले आहे. पॅसिफिक महासागराच्या वर २६० मैल (४१८ किलोमीटर) कक्षेत फिरत असताना कॅप्सूल अनडॉक झाला. हवामान अनकूल असल्यास सायंकाळपर्यंत फ्लोरिडा किनावरुन खाली उतरण्याचे लक्ष ठेवले आहे. (Sunita returns)
मंगळवारी दुपारी पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्यासाठी हे अतंराळयान आता त्याची स्थिती समायोजित करत आहे. नासाच्या अधिकाऱ्यांच्या मते अंतराळवीर त्याच्या परतीचा अधिक कठीण टप्पा सुरू होण्यापूर्वी जेवण करतील आणि कदाचित थोडी विश्रांतीही घेतील, असे न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे. (Sunita returns)
क्रू नाऊन मिशन आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ५७ मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर कोसळणार आहे. नासा डिऑर्बिट जाळणे, पुन्हा प्रवेश करणे आणि लॅंडिगचे थेट कव्हरेज करणार आहे.
रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या क्रू ड्रगन कॅप्सूलमधून पोहोचलेल्या टीमने सुनीता विल्यसम्स् यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी केल्यानंतर आज मंगळवारी पृथ्वीवरील प्रवासास सुरूवात झाली आहे.
हेही वाचा :
गोडसेचा गौरव करणाऱ्याला बढती कशी मिळते?