Home » Blog » Stock Market Crash: गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींना फटका

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींना फटका

शेअर बाजारातील पडझड संपेना…!

by प्रतिनिधी
0 comments
Market Crash

मुंबई : भारतीय शेअर बाजार शुक्रवारी कोसळला. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ८.९ लाख कोटींनी कमी झाले. ते ३८४ लाख कोटींवर स्थिरावले.(Stock Market Crash)

शुक्रवारी सकाळपासूनच बाजाराने पडझड अनुभवली. मुंबई शेअर निर्देशांक १,४४४ अंकांनी म्हणजेच १.९० टक्क्यांनी घसरून तो ७३,१९८.१० अंकावर स्थिरावला, तर निफ्टी ५०४२० अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी घसरून २२,१२४.७० वर बंद झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयात कर लादण्याची घोषणा केली आहे. त्या दिवसापासून बाजारात पडझड सुरूच आहे. त्यातच अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय देशाच्या जीडीपीसंदर्भातही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण जाणवत आहे. .(Stock Market Crash)

निफ्टीत आयटी निर्देशांकाने साडेसहा टक्क्यांपर्यंत जबर तोटा अनुभवला. टेक महिंद्रा, विप्रो आणि एमफेसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

याव्यतिरिक्त, निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये जवळपास चार टक्के घसरण नोंदवली गेली. तर बँक, मेटल, मीडिया, फार्मा, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकांसह इतर क्षेत्रांत ०.७  ते साडेतीन टक्क्यांपर्यंत घट झाली. (Stock Market Crash)

जागतिक पातळीवर सध्या मंदीची भावना आहे. त्याचा परिणाम बाजारावर जाणवत आहे. कॅनडा आणि मेक्सिकोवर अमेरिकेने २५ टक्के आयात कर लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. शिवाय चीनवरही १० टक्के अतिरिक्त आयातकर लागू होण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनवरील शुल्कामुळे अनिश्चितता वाढली आहे. साहजिकच त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा :

मुलीचा मृत्यूशी, पालकांचा व्हिसासाठी संघर्षः सुप्रिया सुळे धावल्या मदतीला

मैतेईच्या टेंगोल गटाने शस्त्रे टाकली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00