Home » Blog » Statues removed: कोल्हापुरातील ‘ते’ पुतळे उतरवले

Statues removed: कोल्हापुरातील ‘ते’ पुतळे उतरवले

कोल्हापूरच्या राजेंद्रनगरात रात्रीत उभारले होते पुतळे

by प्रतिनिधी
0 comments
Statues removed

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरातील एका खासगी जागेत रात्रीत दोन पुतळे उभारण्यात आले. सकाळी पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील नागरिकांना पुतळे हटवण्याची विनंती करण्यात आली. मात्र येथे मोठ्या संख्येने स्थानिक महिला आणि तरुणांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र चर्चेनंतर तूर्त हे दोन्ही पुतळे चबुतऱ्यांवरून उतरवण्यात आले.(Statues removed)

राजेंद्र नगर परिसरात असणाऱ्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेजवळील चौकात शुक्रवारी (४ एप्रिल) रात्री अज्ञातांनी खाजगी जागेत विटांचा चबुतरा उभारला. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पुतळे उभारले. शनिवारी सकाळी हा प्रकार लोकांच्या निदर्शनास आला. पोलिसांना माहिती समजली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने पुतळे उतरवण्याची तयारी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. राजारामपुरी पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. (Statues removed)

घटनास्थळी महापालिका प्रशासनानेही धाव घेतली. प्रशासनाच्या कारवाईला विरोध करत परिसरातील महिला आणि तरुणांनी मोठी गर्दी करून ठाण मांडले. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि दोन्हीही पुतळे चबुतऱ्यांवरून उतरवून स्टेजवर ठेवण्यात आले. (Statues removed)

राजेंद्रनगर चौकात सतीश आनंदराव घोरपडे यांची साडेपाच एकर जागा आहे. तेथील रिकाम्या जागेत अज्ञातांनी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी दोन चबुतरे बांधून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि महापालिका अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत,पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, संजीव झाडे, श्रीराम कणेरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :
बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00