नवी दिल्ली : प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसण्यासाठी उडालेल्या धावपळीवेळी ही चेंगराचेंगरी झाली. प्रयागराज जाणारी रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. या दुर्दैवी घटनेंबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखाची तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वे स्टेशनवरील आपत्ती निवारणाचे कार्य कोसळल्याचे चित्र पहायला मिळाले. (Stampede at delhi)
शनिवारी रात्री नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर ही चेंगराचेंगरी झाली. यावेळी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म बदलाची घोषणा केल्यानंतर ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांनी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. रेल्वेत चढण्यासाठी मोठी गडबड उडाली. श्वास घेण्यात अडचणी आल्याने अनेक प्रवाशी बेशुद्ध पडले. (Stampede at delhi)
अपघाताबद्दल उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशु शेखर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्लॅटफॉर्मवर १४ वर पाटणाकडे जाणारी मगध एक्सप्रेस आणि प्लॅटफॉर्मवर १५ वर जम्मूकडे जाणारी संपर्क क्रांती एक्सप्रेस उभी होती तेव्हा ही घटना घडली. यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होती. अनेक यात्री घसरुन पडले. (Stampede at delhi)
स्टेशनवरील हमाल रिंकू मीणा हा प्रत्यक्षदर्शी होता. ते म्हणाले, चेंगचेंगरी झाली तेव्हा मी पुलावर उभा होतो. प्रयागराजला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म १४ वर येणार होती. त्यानंतर रेल्वेने प्रयागराज प्लॅटफॉर्ममध्ये बदल केल्याची घोषणा केली. प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्यावर दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी जिन्यावर मोठी गर्दी झाली. जिन्यावर बसलेल्या प्रवाशांना तुडवत प्रवाशी रेल्वे पकडण्यासाठी धावत होते. त्यात जिन्यावरुन काही प्रवासी खाली पडले. खाली पडलेल्या प्रवाशांना तुडवत प्रवासी रेल्वेकडे जात होते. (Stampede at delhi)
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि दिल्ली पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले होते पण त्यामध्ये १८ प्रवाशांच्या मृत्यू झाला. मृत्यू झालेले बहुतांशी प्रवाशी प्रयागराजला जाणार होते. मृतामध्ये बिहार आणि दिल्लीतील प्रवाशांची संख्या जास्त असून त्यामध्ये महिला लहान मुलांचाही समावेश आहे. (Stampede at delhi)
अपघातातील घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने चार विशेष रेल्वे सोडल्या. त्यानंतर गर्दी कमी झाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. रविवारी रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती सामान्य झाली आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत ७१ रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :