हैदराबाद : मालमत्तेच्या वादातून येथील वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक, उद्योगपती वेलामती चंद्रशेखर जनार्दन राव यांची मालमत्तेच्या वादातून त्यांच्या नातवाने निर्घृण हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर रविवारी स्थानिक पोलिसांनी त्यांचा नातू किलारू कीर्ती तेजा याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत राव यांच्यावर जवळपास सत्तर वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. (Stabbed over 70 times)
पोलिसांनी आरोपीने वापरलेले हत्यार जप्त केले आहे. तेजाला रोखण्याच्या प्रयत्नात त्याच्या आईलाही त्याने चाकू मारला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. राव यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
‘गुरुवारी रात्री (६ फेब्रुवारी) तेजाचा राव यांच्याशी वाद झाला. राव यांनी आपली संपत्ती कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटू न दिल्याचा आरोप केला. रागाच्या भरात तेजाने आजोबांवर हल्ला केला. त्याने पाठोपाठ सपासप वार केले,’असे पंजागुताचे निरीक्षक बी शोभन यांनी सांगितले. (Stabbed over 70 times)
ते म्हणाले, ‘राव यांना मारल्यानंतर तेजाने रक्ताने माखलेले कपडे बदलले. तो घटनास्थळावरून पळून गेला.’
गुन्ह्यानंतर तेजाने शहर सोडून पलायन केल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी त्याला राव यांच्या घरापासून जवळच असलेल्या पंजागुट्टा उड्डाणपुलाजवळ अटक केली. (Stabbed over 70 times)
तेजा नुकतीच अमेरिकेत मास्टर्स पूर्ण करून हैदराबादला परतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो हैदराबादच्या पश्चिम कॉरिडॉरमधील लॅन्को हिल्समध्ये राहत होता. आपल्याशी भेदभाव केला जातो. कुटुंबातील इतर सदस्यांच्या बरोबरीने वागले जात नाही, असा त्याचा समज झाला होता. ही खदखद तो कायम बोलून दाखवत असे.
हत्येच्या दिवशी तो सायंकाळी आईसोबत आजोबांच्या घरी गेला होता. त्यानंतर राव यांच्याशी त्याने वाद घातला. संतापाच्या भरात त्याने आजोबांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.
तेजाच्या आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावरही हल्ला केला. तिनेच तिच्या ज्युबली हिल्समधील भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा :