फ्लोरीडा : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्यासह चौघा अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगनचे उड्डाण शुक्रवारी, १४ मार्च रोजी अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना घेऊन ते परत येणार येईल. या सर्व अंतराळवीरांचा परतीचा प्रवास १९ मार्च रोजी अपेक्षित आहे. (SpaceX 10)
‘नासा’ची स्पेसएक्स क्रू-१० मोहीम गुरुवारी १३ मार्चला सुरू होणार होती. त्याअंतर्गत ड्रॅगनचे उड्डाण नियोजित होते. मात्र जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. हा अंदाज प्राप्त झाल्यानंतर मिशन व्यवस्थापकांनी बैठक घेतली आणि प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता १४ मार्चरोजी संध्याकाळी ७:०३ पूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर चार क्रू सदस्य पाठवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. (SpaceX 10)
‘नासा’चे अंतराळवीर निक हेग, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह क्रू-९ मोहिमेतील अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह यानाचा परतीचा प्रवास बुधवार, १९ मार्चपूर्वी सुरू होईल. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर स्प्लॅशडाउनच्या ठिकाणी हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन ते उतरवण्यात येईल.(SpaceX 10)
‘नासा’च्या फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए येथे तांत्रिक पथके काम करीत आहेत. फाल्कन ९ रॉकेटसाठी ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्मसह हायड्रॉलिक सिस्टममध्ये काही समस्या येऊ नयेत, यासाठी ही प्रक्षेपण पथके काम करत आहेत. (SpaceX 10)
‘नासा’च्या अंतराळवीर ॲन मॅकक्लेन आणि निकोल आयर्स, जॅक्सा (जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी) अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रोस्कोसमॉस अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह फ्लोरिडा येथील अंतराळवीर क्रू क्वार्टर्समध्ये असणार आहेत.
यानाचे प्रक्षेपण कव्हरेज १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता नासा+ वर सुरू होईल. शनिवारी, १५ मार्च रोजी रात्री ११:३० वाजता डॉकिंगचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
क्रू-१० ही स्पेसएक्सच्या मानवी अंतराळ वाहतूक प्रणालीची १० वी क्रू रोटेशन मोहीम आहे. तसेच ‘नासा’च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या माध्यमातून अंतराळ स्थानकावर क्रूसह होणारे ११ वे उड्डाण आहे. (SpaceX 10)
बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून सुनीता विल्यम्स यांच्यासह अंतराळवीरांनी उड्डाण केले होते. मात्र स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर थांबावे लागले. गेल्या नऊ महिन्यांपासून विल्मोर आणि विल्यम्स या केंद्रात अडकले आहेत.
हेही वाचा :
शेजाऱ्याच्या हल्ल्यात शास्त्रज्ञाचा मृत्यू
तमिळनाडूने बजेटमध्ये रूपयाचे चिन्ह वगळले