नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे चार ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. हिमाचलमधील ताबो क्षेत्रात तापमान उणे १४.७ अंशांपर्यंत कमालीचे घसरले आहे. समदो क्षेत्रात उणे ९.३, कुकुमसैरीत उणे ६.९ तर कल्पा मध्ये उणे २ डिग्री तापमान घसरले आहे. मनालीमध्ये २.८ अंश तापमान नोंदले गेले आहे. (snow fall)
थंडीच्या लाटेमुळे उत्तर भारतातील १४ राज्यात दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे अमृतसर एअरपोर्ट वरील वाहतूक बंद कली आहे. सर्वविमान उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.(snow fall)
दिल्लीमध्येही थंडी आणि धुक्याचा प्रभाव जाणवत आहे. इथली दृश्यमानता ५० मीटर नोंदवली गेली आहे. त्यामुळे स्पाईसजेड, इंडिगो आणि एअर इंडियाच्या १०० फ्लाईटस् वर परिणाम झाला आहे. उत्तरप्रदेशातील ३० शहरात दाट धुके पहायला मिळाले. आगरा रेल्वे स्टेशनवर रेल्वेगाड्या सात तास उशीरा धावत आहेत. बुलंदशहरातील दृश्यमानता पाच मीटरवर आली आहे. मध्यप्रदेशातही थंडी आणि धुक्याचा प्रभाव जाणवत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तर पटनामधील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.(snow fall)
काश्मिरमध्ये बर्फवृष्टी कायम
जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा, बारामुल्ला, अनंतनगर या परिसरातील काही भागात बर्फवृष्टी झाली. श्रीनगरमधील गांदरबलमधील मैदानी क्षेत्रात हलकी बर्फवृष्टी झाली. गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि जोजिलामध्ये बर्फवष्टी झाली. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
हॅलो, मी अंतराळात पोहोचलोय!
झीनत तीन आठवड्यांनी परतली…