नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा वाङ्निश्चय शनिवारी पार पडला. मोजक्याच उपस्थितांसाठी असणाऱ्या या खासगी सोहळ्यामध्ये सिंधू आणि तिचा वाङ्दत्त वर वेंकट दत्त साई यांनी परस्परांना अंगठ्या घातल्या. सिंधूने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सोहळ्याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. (Sindhu)
या महिन्याच्या सुरुवातीस सिंधूने सईद मोदी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर तिचा विवाह ठरल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. दोन्ही कुटुंबांचा बऱ्याच वर्षांपासूनचा परिचय असून २२ डिसेंबर रोजी विवाहसोहळा होणार असल्याचे सिंधूचे वडील पी. व्ही. रामण्णा यांनी सांगितले. २४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे नवपरिणित जोडप्यासाठी रिसेप्शन होणार आहे. सिंधूचा वाङ्दत्त वर वेंकट हा पॉसिडेक्स टेक्नॉलॉजीज् या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. (Sindhu)
हेही वाचा:
लॅथम, सँटनरची अर्धशतके
पहिल्या दिवशी पावसाचा खेळ