जकार्ता : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीमध्ये सलामीलाच पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या तनिशा क्रॅस्टो-ध्रुव कपिला या जोडीने विजयी सलामी दिली. (Sidhu lost)
व्हिएतनामच्या टी. एल. निग्युएनने पहिल्या फेरीमध्ये सिंधूचा अवघ्या ३७ मिनिटांमध्ये २२-२०, २१-१२ असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस दिसून आली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूला लय सापडलीच नाही. महिला एकेरीमध्ये अनुपमा उपाध्याय, तान्या हेमंत, रक्षिता रामराज या खेळाडूंनाही पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असणाऱ्या जपानच्या तामोका मियाझाकीने रक्षिताला २१-१७, २१-१९ असे पराभूत केले. थायलंडच्या रॅचनॉक इंतानॉनने तान्याला २१-१४, २१-११ असे नमवले. इंडोनेशियाच्या पाचव्या स्थानावरील जॉर्जिया मरिस्का तन्जंगने अनुपमाचा २१-१२, २१-१२ असा पराभव केला. (Sidhu lost)
पुरुष एकेरीत भारताचे आयुष शेट्टी, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत हे बॅडमिंटनपटूही सलामीलाच गारद झाले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या चीनच्या शी यू क्वीने पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्याला आयुषला २१-१९, २१-१९ असे हरवले. दक्षिण कोरियाच्या जेऑन जिनने किरणचा २१-१२, २१-१० असा पराभव केला. जपानच्या नवव्या स्थानावरील कोदाई नाराओकाने प्रियांशूला २१-१४, १३-२१, २१-१८ असे नमवले. (Sidhu lost)
मिश्र दुहेरीमध्ये तनिशा-ध्रुव जोडीने पहिल्या फेरीत अदनान मौलाना-इंदेह जामिल या जोडीवर अवघ्या ३६ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१४ अशी मात केली. या गटामध्ये रोहन कपूर-ऋत्विका गड्डे या भारताच्या दुसऱ्या जोडीला मात्र पराभव पत्करावा लागला. इंग्लंडच्या ग्रेगरी माएर्स-जेनी माएर्स या जोडीने रोहन-ऋत्विका जोडीला २१-९, २१-१३ असे पराभूत केले. (Sidhu lost)
हेही वाचा :
सिनर, शेल्डन उपांत्य फेरीत