कोल्हापूर : दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणीय साखळीला मानवी हस्तक्षेपामुळे हानी पोहोचत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाविषयी सजग राहणे गरजेचे आहे. त्यातही युवकांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा गोवा येथील फीडबॅक फाउंडेशन या कचरा व्यवस्थापन संस्थेचे उपाध्यक्ष श्री बालाजी केंद्रे यांनी व्यक्त केली. (CSIBER WORKSHOP)
किर्लोस्कर वसुंधरा उद्योग समूह, दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग, सायबर महाविद्यालया आणि लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक व पर्यावरण संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.(CSIBER WORKSHOP)
ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही खूप व्यापक संकल्पना आहे. दिवसागणिक याचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्याची ताकद युवकांत आहे. असून अतिशय छोट्या छोट्या उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनात हातभार लावला तर हे काम अधिक सोपे होईल.
कचऱ्याचे सुमारे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संबंधित संस्थेकडे दिल्यास कचऱ्यापासून विविध गोष्टींच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. (CSIBER WORKSHOP)
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी किर्लोस्कर उद्योग समूहाच्या मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक हरीष सैवे यांनी युवकांनी पर्यावरणप्रति ठराविक उद्देश ठेवून काम करणे क्रमप्राप्त आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असणार आहे.
कार्यशाळेच्या समारोप सत्राप्रसंगी बोलताना बेळगाव येथील माजी प्राचार्य, पर्यावरण तज्ञ, डॉ. डी. एन. मिसाळे यांनी पर्यावरण रक्षणासाठीचे धोरण या विषयावर मत व्यक्त केले. विविध शासकीय, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून सामूहिकरित्या पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम सातत्यपूर्ण राबवणे गरजेचे असून कृतिशील उपक्रमावर भर देणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. (CSIBER WORKSHOP)
कार्यशाळेची सुरुवात रोपाला पाणी घालून आणि विकास अवघडे यांच्या देशभक्तिपर गीताने करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले यांनी केले तर आभार किर्लोस्कर कंपनीचे सीएसआर डेप्युटी मॅनेजर शरद अजगेकर यांनी मानले. डॉ. सोनिया राजपूत डॉ. टी व्ही जी सरमा, लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. (CSIBER WORKSHOP)
कार्यशाळेत सुमारे शंभरावर विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. सुरेश आपटे प्रा. महेंद्र जनवाडे, मोहन तायडे, कल्याणी सातपुते, भाग्यश्री स्वामी, उत्कर्ष जमदाडे, अर्पिता सुरडकर, अमिषा शिंदे, प्रसाद खवरे, संकेत पिसे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मोनिका भोसले यांनी केले.
हेही वाचा :
रंगबहार मैफल रविवारी