Home » Blog » Shot dead  : जॉर्डन इस्त्रालय सीमेवरील गोळीबारात केरळची व्यक्ती ठार

Shot dead  : जॉर्डन इस्त्रालय सीमेवरील गोळीबारात केरळची व्यक्ती ठार

भारतीय दूतावासाकडून कुटुंबाला ईमेलद्वारे माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Shot dead

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जॉर्डन-इस्रायल सीमेवर झालेल्या गोळीबारात केरळमधील एक व्यक्ती ठार झाली. मृताची ओळख पटली अनी थॉमस गॅब्रिएल (वय ४७ )असे त्यांचे नाव आहे. ते थुंबा येथील रहिवासी होती. एक मार्च रोजी गॅब्रिएलच्या कुटुंबाला भारतीय दूतावासाकडून ईमेलद्वारे त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली. (Shot dead )

कुटुंबातील सदस्य मेटिल्डा यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की, “आम्हाला जॉर्डनमधील भारतीय दूतावासाकडून त्याच्या मृत्यूबद्दल ईमेल मिळाला, परंतु त्यानंतर कोणताही संपर्क झालेला नाही.”  ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडली.  जॉर्डन इस्त्रालय सीमेवर जॉर्डनच्या लष्करी कर्मचाऱ्यांनी सीमेवर गोळीबार केला. त्यामध्ये ग्रॅबियल यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात आणखी एक नातेवाईक एडिसन थोडक्यात बचावला. त्याला गोळी लागली आणि जखमी होऊन घरी परतला आहे, अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली. (Shot dead )

 पाचफेब्रुवारी रोजी निघण्यापूर्वी गॅब्रिएलने त्याच्या कुटुंबाला कळवले होते की तो तामिळनाडूतील ख्रिश्चन तीर्थक्षेत्र वेलंकन्नी येथे जात आहे, असे एका नातेवाईकाने एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. टेलिव्हिजन दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, एका एजंटच्या मदतीने चौघे जण  जॉर्डनहून इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये गॅब्रिएल आणि एडिसन  होते. तीन महिन्यांच्या व्हिजिट व्हिसावर चौघे जॉर्डनमध्ये दाखल झाला होते. जेव्हा जॉर्डनच्या सैन्याने सीमेवर त्यांचा सामना केला तेव्हा या गटाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे सैनिकांनी गोळीबार केला.  त्यामध्ये गॅब्रियल ठार झाला. अहवालात असे म्हटले आहे की गॅब्रिएलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर एडिसनच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला भारतात परत पाठवण्यापूर्वी जॉर्डनच्या लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले. एडिसन परतल्यानंतरच गॅब्रिएलच्या कुटुंबाला जॉर्डनमध्ये त्याची उपस्थिती कळली. दूतावासातून चौकशी केल्यानंतर त्यांना त्याच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी मिळाली. (Shot dead )

हेही वाचा :

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जत्रेत छेडछाड

 मोहन भागवत महाकुंभला का गेले नाहीत ?

 दलित ख्रिश्चनांविरोधात चर्चकडूनही अस्पृश्यता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00