मुंबई : प्रतिनिधी : प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर आयपीएलची क्रिकेट मॅच बघत एसटी चालवत असल्याचा एका शिवनेरी बसचालकाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस मधील एका प्रवाशाने त्याचेही बेफिकरीचे कृत्य मोबाईल मध्ये शूटिंग करून परिवहन मंत्र्यांना पाठविले. त्यानंतर खासगी कंपनीच्या संबंधित चालकाला बडतर्फ करण्यात आले. तसेच एसटी बस प्रशासनाकडून कंपनीला पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. दादर ते स्वारगेट (पुणे) शिवनेरी बस ( एम.एच.१२ व्हीएफ-८०१७) मध्ये शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बस लोणावळ्याजवळ असताना चाणाक्ष प्रवाशाने या घटनेचे चित्रण केले. (Shivneri Bus)
शनिवारी सायंकाळी सात वाजता खाजगी ई-शिवनेरी बस दादर येथून निघाली. रात्री लोणावळाजवळ बसचा चालक बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांने केले. हे चित्रण त्याने सोशल मिडियावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. त्यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले असून संबंधित खाजगी संस्थेला दंड ठोठावला आहे. अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचे सांगितले. (Shivneri Bus)
परिवहन विभागाकडून नवीन नियमावली आणणार
खाजगी अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचे चालक देखील कानात हेडफोन घालून गाडी चालवत मोबाईलवर मॅच अथवा चित्रपट पाहत असल्याच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून येत आहेत. या संदर्भात परिवहन विभागाकडून नवीन नियमावली निश्चित करून निर्बंध आणले जातील.”
: प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री) (Shivneri Bus)
हेही वाचा :
न्यायाधीश निवासस्थानातील ‘जळीत नोटा’ चौकशी अहवाल प्रसिद्ध
कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द