Home » Blog » Shivaji University: विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई

Shivaji University: विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई

इंडिया आघाडी, शिवप्रेमींच्या बैठकीत निर्धार

by प्रतिनिधी
0 comments
Shivaji University

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात आता कृतिशील लढाई लढण्याचा निर्धार शनिवारी (२२ मार्च) करण्यात आला. इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची बैठक सर्किट हाउसच्या शाहू सभागृहात झाली. त्यावेळी हा निर्धार करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून येत्या २६ मार्चला विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ‘माझं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ या घोषणेचा जयघोष करण्यात येणार आहे.(Shivaji University)

विद्यापीठाच्या नामंतराला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी, शिवप्रेमी संघटना, प्राध्यापक आणि सेवक संघटनांची बैठक झाली. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.

विजय देवणे म्हणाले, ‘विद्यापीठाच्या सिनेटमध्ये नामांतर विरोधात स्थगन प्रस्ताव स्वीकारणे हाच आपला पहिला विजय आहे. आता विद्यापीठाचे नामांतर का नको हे लोकांना, विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृती आराखडा आखला आहे. २६ मार्चला सकाळी १० वाजता विद्यापीठात ‘माझं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ,’ असा जयघोष करण्यात येईल.’ कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोपरा सभा घेऊन नामांतरविरोधी जनजागृती, विद्यापीठाच्या नावाचा इतिहास सांगणारी पत्रके वाटण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या एक लाख सह्यांची मोहीम राबवण्यासह पदवीधरांचे मेळावे घेण्यात येतील, असे ते म्हणाले. (Shivaji University)

कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात सभा घेण्यात येतील. सरकारने आमची मागणी न ऐकल्यास मुंबईत धडक मोर्चा नेऊ, पण विद्यापीठाचे नामांतर होऊ देणार नाही, असा इशारा देवणे यांनी दिला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, बाहेरचा कुणी येऊन आम्हाला शहाणपण शिकवत असेल तर त्याचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यांची पळता भुई थोडी करु, पण विद्यापीठाचे नामांतर होऊ देणार नाही. (Shivaji University)

विद्यापीठाच्या नामांतराला पाठिंबा देणारे कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा शिवप्रेमींनी तीव्र निषेध केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ॲड. अभिषेक मिठारी, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, डी. यू. पवार, सतीशचंद्र कांबळे, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, शेकापचे बाबुराव कदम, इंद्रजित सावंत, भारती पोवार, सरलाताई पाटील, हर्षल सुर्वे, ॲड. अजित पाटील, दगडू भास्कर, राम तुपे, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, उत्तम पाटील, रमेश पोवार, श्वेता परुळेकर, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :
विनोद कुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ जाहीर
 ‘सीबीएसई’ सुरु करुन शिक्षण मंडळ बंद करणार का?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00