Home » Blog » Shivaji entered final : शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

Shivaji entered final : शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत

खंडोबा तालीम पराभूत

by प्रतिनिधी
0 comments
Shivaji entered final

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळाचा टायब्रेकरमध्ये ४-२ असा पराभव करत उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Shivaji entered final)

शिवाजी आणि खंडोबा यांच्यातील पहिला उपांत्य सामना अत्यंत चुरशीचा झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी वेगवान चढाया करत आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. शिवाजीकडून योगेश कदम, करण चव्हाण बंदरे, इंद्रजीत चौगुले तर खंडोबाकडून अमीन खजीर, पृथ्वीराज साळोखे, रोहित जाधव, प्रभू पोवार यांनी जोरदार चढाया केल्या. पण दोन्ही संघ गोल न करु शकल्याने मध्यंत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत होता. (Shivaji entered final)

उत्तरार्धात खंडोबाने धडाकेबाज सुरुवात केली. त्यांच्या अमीन खजीरने लागोपाठ दोन गोल केले. ४६ व्या मिनिटाला रोहित जाधवच्या पासवर अमीन खजीरने गोल केला. अमीने दुसरा गोल पृथ्वीराज साळोखेच्या पासवर गेला. सलग दोन गोलची आघाडी घेतल्याने शिवाजी संघावर दबाव आला. पण परतफेड करण्यासाठी त्यांनी सुत्रबद्ध चढाया केल्या. ६५ व्या मिनिटाला सुयश हंडेच्या पासवर संकेत नितीन साळोखेने गोल करत आघाडी कमी केली. शिवाजीचा दुसरा गोलही संकेत साळोखेनेच केला. इंद्रजीत चौगुलेच्या पासवर संकेतने गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. पूर्णवेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतर मुख्य पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. (Shivaji entered final)

टायब्रेकरमध्ये शिवाजी संघाकडून सुयश हांडे, बसंता सिंग, योगेश कदम, करण चव्हाण बंदरेने गोल केले. खंडोबा संघाकडून पहिला पेनल्टीचा फटका अमीन खजीरने मारला. तो फटका शिवाजीचा गोलरक्षक जिगर राठोडने रोखला. ऋतुराज संकपाळची पेनल्टी पोलला तटली. प्रभू पोवार, अथर्व पाटील यांनी पेनल्टी मारल्या. शिवाजी संघाने ४-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. (Shivaji entered final)

शनिवारचा दुसरा उपांत्य सामना : पाटाकडील तालीम मंडळ अ वि. बालगोपाल तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00