Home » Blog » Shetty jabs Kokate: ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

Shetty jabs Kokate: ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड

by प्रतिनिधी
0 comments
Shetty jabs Kokate

मुंबई/कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्याला आणखी वेदना होतील, अशी वक्तव्य करणारा हा बेअक्कल, बिनडोक आणि भंपक कृषी मंत्री महाराष्ट्राला मिळाला, अशी जहरी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ( Shetty jabs Kokate)

कोकाटे यांनी नाशिकमध्ये नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी बोलताना, कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता असा उलट सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. कर्जमाफीच्या पैशातून एक रूपयाचीतरी गुंतवणूक करता का, असा सवाल कोकाटे यांनी केला. ( Shetty jabs Kokate)

त्यावर राजू शेट्टी म्हणाले, ‘याच कृषीमंत्र्याने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांबरोबर केली. आता म्हणतायहेत तुमचे कर्ज माफ झाले तर ते साखरपुड्यासाठी खर्च करता. तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता. याना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्यांचे कर्ज सरकार भरणार आहे, ते बँकेत जाणार आहे, ते शेतकऱ्यांच्या हातात येणार नाहीत. कृषी मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे, याचा अभ्यास करावा, आणि मग शेतकऱ्याचे अर्थशास्त्र समजून घ्यावे.’

सोयाबीन हमीभावापेक्षा बाराशे रुपये कमी दराने विकायची वेळ आलेली आहे. त्यांच्याच कर्तृत्वामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. हरभऱ्याची अवस्थाही तीच आहे. तूर, हरभरा आणि कापसाचीही परिस्थिती तीच आहे आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत. ( Shetty jabs Kokate)

तुमची औकात नव्हती, हिंमत नव्हती तरी आमचे सरकार आल्यानंतर तुमचा सात-बारा कोरा करतो, असे सांगत शेतकऱ्याला फसवून तुम्ही मते का घेतली?, या प्रश्नाचे पहिल्यांदा कृषिमंत्र्यांनी उत्तर द्यावे.
राजू शेट्टी, शेतकरी नेते

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कोकाटेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘कृषिमंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशकांत कांदा, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणे गरजेचे होते, पण हे सरकार संवेदना नसलेले आहे.’’

काय म्हणाले कोकाटे?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, ‘‘तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता? शेतीमध्ये  एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का त्याची.आता सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे.शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात.भांडवली गुंतवणूक सरकार देते. शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा. लग्न करा.’’

हेही वाचा :
बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?
अभय कुरूंदकर दोषी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00