Home » Blog » Shaktipeth: ‘शक्तीपीठ’वरून मुश्रीफ-क्षीरसागर आमने सामने

Shaktipeth: ‘शक्तीपीठ’वरून मुश्रीफ-क्षीरसागर आमने सामने

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीतील राजकारण तापले

by प्रतिनिधी
0 comments
Shaktipeth

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरुन जिल्ह्यातील महायुतीचे नेते आमने सामने आले आहेत. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. दुसरीकडे मंत्री मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केला असल्याचा दावा केला आहे. क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या काही नेत्यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी अंतर्गत संबंध असल्याचा आरोप मुश्रीफ यांचे नाव न घेतला केला.(Shaktipeth)

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक रसद पुरवली, असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. ते  म्हणाले, ‘महायुतीचा शक्तीपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना या प्रकल्पाला विरोध करता येणार नाही. मी ‘मित्रा’ या संस्थेचा उपाध्यक्ष असल्यामुळे राज्याचे प्रकल्प पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे. हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या खात्यापुरती त्यांची जबाबदारी मर्यादित आहे. त्यामुळे त्यांच्यासह महायुतीच्या कुणीही नेत्यांनी या प्रकल्पाला विरोध करू नये. शेतकऱ्यांना पाचपट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.’ (Shaktipeth)

राजेश क्षीरसागर यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात आहे की,  शक्तीपीठ महामार्ग झाल्यास जिल्ह्यात चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण होतील. औद्योगिक, आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. यातून स्थानिकांना रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची इतर जिल्ह्यांशी कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. विरोधकांनी निर्माण केलेले गैरसमज दूर होत असल्याने शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ अनेक शेतकरी बांधव पुढे येत आहेत. त्यामुळे महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास महायुतीच्या सर्वच नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी एकजुटीने पाठबळ द्यावे. (Shaktipeth)

या महामार्गामुळे राज्यातील १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गामुळे १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. पंरतु राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल केली जात आहे. यामध्ये महायुतीचे काही नेते विरोधकांना अंतर्गत मदत करत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब वेदनादायी आहे. या नेत्यांची नेहमीच काँग्रेस नेत्यांशी संलग्न अशी भूमिका राहिल्याची बाब आता महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आली आहे. हा प्रकल्प महायुतीचा असून, जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा आहे, असा दावाही या पत्रकात केला आहे.

हेही वाचा :

सावंत थोड्या दिवसाचा पाहुणा…

पत्नीकडून छळ; टीसीएस मॅनेजरची आत्महत्या

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00