Home » Blog » Shaktikanta Das : शक्तिकांत दास मोदींचे प्रधान सचिव

Shaktikanta Das : शक्तिकांत दास मोदींचे प्रधान सचिव

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून पायउतार होताच नियुक्ती

by प्रतिनिधी
0 comments
Shaktikanta Das

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्याचे प्रधान सचिव प्रमोदकुमार मिश्रा यांच्या बरोबरीने दुसरे सचिव म्हणून दास काम पाहतील. दोन महिन्यांपूर्वीच दास गव्हर्नर पदावरून पायउतार झाले होते. (Shaktikanta Das)

तमिळनाडू केडरचे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या दास यांना चार दशकांहून अधिक काळचा प्रशासकीय अनुभव आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. ते या पदावर रुजू होताच त्यांच्या कार्यकाळ सुरू होईल, असे या समितीने म्हटले आहे. दास यांनी तब्बल सहा वर्षे आरबीआय गव्हर्नर म्हणून काम पाहिले असून ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कार्यकाळ असणारे गव्हर्नर आहेत. त्याचबरोबर, त्यांनी केंद्रीय अर्थसचिव, महसूल सचिव, जी-२० परिषदेतील भारताचे प्रतिनिधी, पंधराव्या नियोजन आयोगाचे सदस्य आदी पदांवरही काम केले आहे. (Shaktikanta Das)

डिसेंबर, २०१८ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षक भुवनेश्वर येथे झाले आहे. त्यानंतर दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात बीए व एमएचे शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये उत्कल विद्यापीठाने त्यांना डिलिट देऊन गौरवले होते. मोदींचे सध्याचे प्रधान सचिव प्रमोदकुमार मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते २०१९ पासून या पदावर आहेत. तत्पूर्वी, ते २०१४ ते २०१९ या कालावधीत मोदींचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. दास आता त्यांच्याजोडीने पंतप्रधान कार्यालयाचे काम पाहतील.   

हेही वाचा :

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

सध्याच्या कठिण काळात साहित्यिकांवर मोठी जबाबदारीःशरद पवार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00