Home » Blog » Shahid College: ‘शहीद’च्या विद्यार्थिनींचे कर्तृत्व भारावून टाकणारे

Shahid College: ‘शहीद’च्या विद्यार्थिनींचे कर्तृत्व भारावून टाकणारे

विजयालक्ष्मी आबिटकर : शहीद महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

by प्रतिनिधी
0 comments
Shahid College

तिटवे : शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींमध्ये असलेला आत्मविश्वास, मेहनत आणि नवकल्पनांचा विचार पाहून मन भारावून गेले आहे. अशीच उत्तुंग प्रगती करत रहा, आपल्या संस्थेचे नाव उंचावत रहा, असे मत विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिटकर यांनी व्यक्त केले. शहीद महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.(Shahid College)

शिक्षणतज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, वंदना जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हजारावर मुलींच्या जल्लोषपूर्ण सहभागात शहीद वीर पत्नी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. (Shahid College)

याप्रसंगी विशेष उपस्थित असलेले संस्थेचे मुख्य मार्गदर्शक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर भरारी, सामाजिक कार्यात आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात अतुलनीय काम असे अनेक मानदंड स्थापित करण्याचे काम केवळ सहा वर्षे वयाच्या शहीद वीर पत्नी महाविद्यालयाने केले आहेत. खेडोपाड्यातील, वाड्या वस्तींमधील मुलींनी हा चमत्कार  केला आहे. आपण कोण आहोत, समाजाला काय देणे लागते हे शहीद  शिक्षण प्रसारक मंडळ  विद्यार्थ्यांना शिकवते आणि विद्यार्थ्यांकडून  करून घेते याचे उदाहरण म्हणजे आमच्या संस्थेने २५ हजारांवर झाडे लावली आणि त्याचे पालनपोषणही केले जाते. (Shahid College)

संस्थेच्या पुढाकाराने  पर्यावरण संवर्धन केंद्र पाल भुदरगड  येथे सुरू करण्याचा  मानस आहे. हे केंद्र जागतिक पातळीवर पर्यावरणप्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल. जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक या केंद्राला भेट देतील आणि पर्यावरण रक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रेरणा घेतील, असे डॉ. पाटील म्हणाले.

ज्या क्षेत्रात काम कराल, तिथे सर्वोत्तम बना, नवीन कौशल्य शिकत राहा, यशस्वी बना. मेहनत, चिकाटी आणि जिद्द ठेवा म्हणजे नक्कीच तुमची स्वप्नं पूर्ण होतील, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या पोलिस उपअधीक्षक  वैष्णवी पाटील यांनी व्यक्त केला. (Shahid College)

राधानगरीच्या पोलिस  सब इन्स्पेक्टर  प्रणाली पवार यांनी ‘तुमच्या नावाने तुमच्या आईवडिलांना ओळखलं पाहिजे अशी ओळख निमार्ण करा असे मत व्यक्त केले.’

शहीद संस्थेचे उल्लेखनीय कार्य पाहून डोळे आनंदाने भरून आले, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी सभापती वंदना जाधव यांनी काढले.

यावेळी डॉ. राजेंद्र पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी वीरपत्नी मालुताई मगदूम, पौर्णिमा कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, प्रा. सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे वॉक ऑफ फेम सोहळा, जिथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. मुंबई पोलीस, इंडियन पोस्ट, इन्फोसिस, विप्रो, आयसीआयसीआय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपले स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने एक वेगळा ठसा उमटवला.

हेही वाचा :

औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00