नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरस्थित हुर्रियत कॉन्फरन्सच्या आणखी दोन घटकांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नवीन भारत’च्या स्वप्नावर त्यांची वचनबद्धता आणि विश्वास व्यक्त केला आहे. खोऱ्यात आता फुटीरतावाद शेवटची घटका मोजत आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (२७ मार्च) व्यक्त केला.(Shah on Separatism)
शहा म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावाद नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आता खोऱ्यात एकता बळकट होत आहे.
शहा यांनी ‘एक्स’वरही पोस्ट केली आहे. ‘काश्मीर खोऱ्यातून आणखी एक चांगली बातमी. हुर्रियतशी संलग्न असलेले जम्मू आणि काश्मीर तहरीकी इस्तेकलाल आणि जम्मू आणि काश्मीर तहरीक-ए-इस्तेकमत या दोन गटांनी फुटीरतावादाचा त्याग केला आहे. आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘नवीन भारता’वर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे, ’ असे त्यांनी म्हटले आहे.(Shah on Separatism)
‘मोदी सरकारच्या काळात फुटीरतावाद शेवटची घटका मोजत आहे आणि एकतेचा विजय संपूर्ण काश्मीरमध्ये प्रतिध्वनीत होत आहे,’ असे शह यांनी म्हटले आहे.
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) आणि जम्मू आणि काश्मिर डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मुव्हमेंट (जेकेडीपीएम) यांनीही फुटीरतावादासोबतचे संबंध तोडले.(Shah on Separatism)
या घडामोडींचे स्वागत करताना शाह यांनी या बदलाचे श्रेय मोदी सरकारच्या धोरणांना दिले आणि म्हटले आहे की, मोदी सरकारच्या एकात्म धोरणांमुळे जम्मू-काश्मीरमधून फुटीरतावाद संपत चालला आहे.
आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी सरकारी सेवेत परत येण्यापूर्वी स्थापन केलेल्या जेकेपीएमने एक निवेदन जारी केले. त्यात त्यांचे अध्यक्ष शाहिद सलीम यांनी जम्मू-काश्मीरच्या तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत हुर्रियतची विचारसरणी नाकारली. त्याचप्रमाणे, वरिष्ठ डीपीएम नेते मोहम्मद शफी रेशी यांनी गिलानीच्या नेतृत्वाखालील हुर्रियत गटापासून पूर्णपणे अलिप्त राहण्याची घोषणा केली. तसेच स्वतःला संविधानाशी वचनबद्ध असलेला एक प्रामाणिक भारतीय नागरिक घोषित केले.
हेही वाचा :
भाजपने हिंदुत्व सोडले का?
तमिळनाडू सरकारचा वक्फ विधेयकाविरोधात ठराव