Home » Blog » Shah Criticise Pawar : पवारांकडून दगाफटक्याचे राजकारण

Shah Criticise Pawar : पवारांकडून दगाफटक्याचे राजकारण

अमित शहांची पवार, ठाकरेंवर तोफ

by प्रतिनिधी
0 comments
Shah Criticise Pawar

शिर्डी : प्रतिनिधी : शिर्डी येथील भाजपच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव  ठाकरे यांच्यावर कठोर टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणात १९७८ पासून शरद पवार यांनी दगाफटक्याचे राजकारण सुरू केले. त्या राजकारणाला जमिनीत २० फूट गाडण्याचे काम केले. २०१९ मध्ये भाजपशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका शहा यांनी केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा निवडून द्यायची नाही, असा कानमंत्रही शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. (Shah Criticise Pawar)

अमित शहा यांनी भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळवून दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते आमदार झाले आणि मंत्रीही झाले. खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी पक्षालाही मोठा विजय मिळवून दिला. १९७८ ते २०२४ पर्यंत राज्यात अस्थिरता होती. हे अस्थिरतेचे राजकारण संपले असून देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार निवडून देण्याचे काम केले आहे. (Shah Criticise Pawar)

२०२४ हे वर्ष भाजपसाठी चांगले राहिले आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असे सांगून शहा म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने चांगले यश मिळवले. २०२५ ची सुरुवात दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून करायची आहे. महाराष्ट्रात भाजपचे ४० लाख सदस्य असून ती संख्या दीड कोटीवर न्यायची असल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या मताधिक्यांनी विजयी वायचे असून विरोधकांना एकही जागा मिळणार नाही यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Shah Criticise Pawar)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप पक्षामध्ये  श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजला त्यांची निवडणुकीत काय अवस्‍था झाली हे सर्वांनी पाहिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या.  गेल्या ३० वर्षांत ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. महायुतीने २८८ पैकी २३७ जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष  आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने राज्यात व्होट जिहाद केला.  निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘एक हैं तो सेफ हैं  चा नारा यापुढे महाराष्ट्रातील पुढील निवडणुकीत कायम ठेवायचा आहे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00