महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे पैसे कापण्यात आले मात्र त्याचा भरणाच झाला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारकडून जवळपास ३ हजार कोटींची रक्कम अद्याप दिली गेली नसल्याचा आरोप आकडेवारीसह महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. (Maharashtra ST)
एसटी कर्मचारी भविष्याच्या अनुषंगाने देय असलेली रक्कम देण्यात सरकार उदासीन असल्याचं समोर आलं आहे. पीएफ, मेडिकल बिले, एलआयसी यासह वेगवेगळ्या सुविधा देण्यातील निधी सरकारने अद्याप दिला नसल्याने तो भरण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ लालपरीच्या प्रवाशांसाठी अनेक नव-नवीन घोषणा करते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे जवळपास ६० कोटी रूपयांची रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाकडून अद्याप भरलेली नाही. जर एसटी कर्मचाऱ्याच्या दुर्दैवाने अपघात झाला तर या एलआयची पॉलिसीचा फायदा होणं अपेक्षित असताना मात्र एसटीने पगारातून एलआयसीचे पैसे कापले मात्र ते वेळेवर एलआयसीला भरले नाही तर तो कर्मचारी डिफॉल्टर ठरेल मग त्याला फायदा कसा मिळेल?’, असा सवाल महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. (Maharashtra ST)
हेही वाचा :
- राजू शेट्टी झाले मुंबईकर
- महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ७,६४५ कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ