कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. कोरटकरला ठेवण्यात आलेल्या पोलिस स्टेशन आणि आवारात असलेल्या सीसीटीव्हीचा तपशील इंद्रजीत सावंत यांनी वकिलांमार्फेत पोलिसांकडे मागितला आहे. त्यांनी वकिलामार्फेत तपास अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र दिले आहे. दरम्यान कोरकटर याच्या आवाजाचे नमुने आज घेण्यात येणार आहेत. त्याच्या आवाजाच्या नमुने घेण्याची मागणी फिर्यादी पक्षांकडून करण्यात आली आहे. (Sawant’s demand)
राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरच्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून कोरटकरला अटक केली. त्यानंतर त्याला बुधवारी दि.२५ कोल्हापूरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असतात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी सात दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती. (Sawant’s demand)
कोरटकरला राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणची पोलिस कोठडी अतिशय सुरक्षित असून शहरातील बहुतांशी संशयितांना इथेच ठेवले जाते. कोरटकरला ज्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे, ज्या पोलिस ठाण्यात तपास केला जाणार आहे, त्या ठिकाणातील संपूर्ण कार्यालय व आवारातील सीसीटीव्ही तपशील इतिहास संशोधक सावंत यांनी एका अर्जाद्वारे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांकडे मागितला आहे. सावंत यांनी वकील योगेश सावंत, हेमा काटकर, पल्लवी थोरात यांच्यावतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे अर्ज दिला आहे. (Sawant’s demand)
अटक होण्यापूर्वी कोरटकर नागपूर येथून पळून गेला होता. १३ मार्च आणि १४ मार्च रोजी तो चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालयाच्यासमोरील हॉटेलमध्ये होता. तिथे त्याची काही पोलिस अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. कोरटकरचे पोलिस दल आणि महसुल विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख आहे. कोरटकरला पळून जाण्यास नागपूर आणि कोल्हापूर पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोपही होत आहे. या पार्श्वभूमीवर अटक केलेल्या कोरटकरला पोलिस ठाण्यात कोणी भेटायला येण्याची शक्यता असल्याने बचावपक्षाकडून सीसीटीव्हीचा तपशील मागितला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sawant’s demand)
हेही वाचा :
कोर्ट आवारात कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न
कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी