Home » Blog » SATEJ PATIL: गरजूंना साथ, शैक्षणिक साहित्य वाटप

SATEJ PATIL: गरजूंना साथ, शैक्षणिक साहित्य वाटप

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिनी देणार मदतीचा हात

by प्रतिनिधी
0 comments
SATEJ PATIL

कोल्हापूर : प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस भव्यदिव्य स्वरुपात साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्त्याच्या बैठकीत करण्यात आला. मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपापासून ते क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हशी पळवणे स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (SATEJ PATIL)
आमदार सतेज पाटील यांचा येत्या १२ एप्रिलला ५३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वह्या आणाव्यात असे आवाहन संयोजकांनी केले.(SATEJ PATIL)
जिल्हा काँग्रेस कमिटी, विविध संघटना व तरुण मंडळांच्यावतीने सतेज क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, म्हैशी स्पर्धा, फळे वाटप, रक्तदान शिबिर यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने संविधान आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहचवून समाजाला जागृत करण्याची गरज आहे. या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हा सतेजमय करु असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सर्वसामान्यांना तळागाळातील कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे हा वाढदिवस नाही तर एखादा सण म्हणून साजरा करा, असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिल घाडगे म्हणाले, वाढदिवस एका बहुजनांच्या नेत्याचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळावे अशा पद्धतीने नियोजन करावे. (SATEJ PATIL)
भारती पवार, वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमाचा आयोजन करावे.
सुनील मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाला आहे तेच नाव राहिले पाहिजे यासाठी सतेज पर्व शिवाजी विद्यापीठ हेच नाव खरं अशी मानवी साखळी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, आमदार सतेज पाटील यांनी आजवर सर्वांना भरभरून प्रेम दिले आहे त्यामुळे त्यांना साजेल असा वाढदिवस साजरा केला पाहिजे. तसेच मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या शाळेला भोजन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.(SATEJ PATIL)
माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, सतेज पाटील यांनी आजवर केलेल्या कामाचा जयघोष आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसू दे. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी सतेज पाटील यांनी सर्किट बेंचसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मोठे होर्डिंग उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर मारुतराव कातवरे, माजी महापौर भिमराव पोवार, सूर्यकांत पाटील-बुध्दिहाळकर, बाळासाहेब सरनाईक, चंद्रकांत यादव, गोकुळ संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाबासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित दिनकरराव जाधव, माजी नगरसेवक संजय मोहिते, अर्जुन माने, प्रताप जाधव, संदीप नेजदार, इंद्रजीत बोंद्रे, विजय सुर्यवंशी,राजू साबळे, विनायक फाळके, महेश बराले, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, बबन रानगे, रियाज सुभेदार, बिद्री साखर कारखाना संचालक एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, गोपाळ पाटील, शशिकांत खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, बाबासाहेब माळी, बाजीराव पाटील, भगवान पाटील, एकनाथ पाटील, जीवन पाटील, संभाजी पाटील, बंकट थोडगे, सदाशिव चरापले संजयसिंह पाटील, विद्याधर गुरबे, सचिन घोरपडे, विनायक घोरपडे, प्रा. टी. एस. पाटील, भरत रसाळे यांच्यासह या बैठकीस जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन सालपे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

बीडच्या बॉम्बस्फोटाचे सूत्रधार कोण ?
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकरचा पंचनामा

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00