Home » Blog » Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Sapkal slams Ajit Pawar

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राक्षसी बहुमताने सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली, पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे ते मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी टीका आणि संताप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवालही सपकाळ यांनी विचारला.(Sapkal slams Ajit Pawar)

उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना  ते म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण आजही लाडक्या बहिणींना १५०० रुपयेच दिले जात आहेत. उलट १० लाख बहिणींच्या नावांना कात्री लावत योजनेतून बाद केले. शेतकरी कर्जमाफीवर बजेटमध्ये एक शब्दही काढला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शाह यांचे सतत गुणगाण गात असतात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पशेल पॅकेज घेऊन यावे. (Sapkal slams Ajit Pawar)

मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेत ते म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग वाढला, पण मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे, लघू, छोटे आणि मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी आणि जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआयमध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला.

महापालिकांत प्रशासन राज

लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरीब होत आहेत, पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे. त्यांच्या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला. (Sapkal slams Ajit Pawar)

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्हास नगर, कल्याण डोंबिवलीला भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची योजना राबवली, बांग्लादेशाची निर्मिती केली, बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले, संगणक क्रांती आणली. डॉ. मनमोहन सिंग सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली होती, याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आदी  उपस्थित होते.

हेही वाचा :

कोरटकरवर कोर्टात हल्ला

प्रशांत कोरटकरसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील प्रतिक पडवेकर? 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00