महाराष्ट्र दिनमान, सांगली प्रतिनीधी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काळीज पिळवून टाकणारी घटना आज (दि.२९) घडली आहे. या घटनेमध्ये एकाचवेळी घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीनजण अचानक मृत्यू पावल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिशनाथ मारुती वनमोरे (वय ४० ), साईराज वनमोरे (वय १३) आणि प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) असे मृतांची नावे आहेत. विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Sangali News)
Sangali News : वैरण आणायला जाणं ठरलं शेवटचं…
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ (ता.मिरज) पारिशनाथ वनमोरे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी थ्री फेज विजेची तार तुटून पडली होती. पारिश नाथ आणि साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत यालाही शॉक लागला. यामध्ये प्रदीप हा जागीच ठार झाले तर हेमंत गंभीर जखमी झाला आहे. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे (वय १४) असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनमोरे कुटुंबासोबत गेलेला कुत्रा देखील विजेचा शॉक लागून मृत पावला आहे.
हेही वाचा
- सांगलीच्या राजकारणात ‘दुष्काळी दबावा’चा पट्टा
- श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
- संजयकाका पाटील पुन्हा वादात, मारहाणीचा आरोप