नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसारख्याच ‘महिला समृद्धी योजने’ला दिल्ली सरकारने मान्यता दिली. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहे.(Samruddhi yojana)
महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी लवकरच एक पोर्टल सुरू केले जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले.
दिल्ली सरकारने शनिवारी महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिली. ज्याअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा २,५०० रुपये भत्ता मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शनिवारी केली. (Samruddhi yojana)
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या अधिवेशनाच्या समारोपानंतर बोलताना गुप्ता म्हणाल्या, “या पवित्र प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही (शनिवारी) दिल्ली मंत्रिमंडळाची बैठक घेतली. महिला समृद्धी योजनेअंतर्गत आमच्या संकल्पपत्रात (जाहिरनाम्यात) दिल्लीच्या भगिनींना दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे.”
“आम्ही दिल्लीच्या गरीब भगिनींना दरमहा २,५०० रुपये मिळतील असे आश्वासन दिले होते; आज आम्ही यावर आमची मोहर लावली आहे. आम्ही या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यासाठी (या आर्थिक वर्षासाठी) अर्थसंकल्पात ५,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे जेणेकरून आम्ही या योजनेअंतर्गत लाभ देण्यास सुरुवात करू शकू,” असे त्या म्हणाल्या. (Samruddhi yojana)
योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात मंत्रिमंडळातील सहकारी आशिष सूद, परवेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांचा समावेश आहे. या योजनेसाठी नोंदणी लवकरच सुरू होईल. योजनेच्या अटी आणि शर्ती पोर्टलवर पाहायला मिळतील. ते लवकरच सुरू केले जाईल अशी ग्वाहीही गुप्ता यांनी दिली.
दिल्लीतील महिलांचे अभिनंदन आणि आभार मानून गुप्ता म्हणाल्या, ‘‘आज ही योजना मंजूर झाली आहे. मी आपणास खात्री देऊ इच्छिते की महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सर्व काम तसेच त्यांच्या विकासाशी संबंधित आश्वासने लवकरच पूर्ण केली जातील. (Samruddhi yojana) ही योजना पारदर्शक, कार्यक्षम असेल. संबंधित महिलांना आर्थिक लाभांचे अखंड वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असे या घोषणेनंतर दिल्ली सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :
बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!
हम्पीमध्ये परदेशी पर्यटक महिलेवर अत्याचार