महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप हॅक करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सॅंम पित्रोदा यांनी दिली आहे. याबद्दल बोलताना आज (दि.७) सॅम पित्रोदा म्हणाले की, काही आठवड्यांपासून स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारखा हॅक झाला आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉप हॅक करणाऱ्या हॅकर्संनी धमकी देत माझ्याकडे क्रिप्टोकरन्सीमध्ये हजारो डॉलर्सची मागणी केली आहे. (Sam Pitroda)
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये सॅम पित्रोदा यांनी सांगितले की, मला एक महत्वाची बाब तुमच्या निर्दशनास आणून द्यायची आहे. गेल्या काही आठवड्यांपासून माझा स्मार्टफोन आणि लॅपटॉप वारंवार हॅक झाले आहेत. हॅकर्सनी माझ्याकडे क्रिप्टोकरन्सीमध्ये हजारो डॉलर्सची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न ते माझ्या संपर्कातील लोकांशी संपर्क साधून माझी प्रतिमा मलिन केली जाईल अशी धमकी दिली आहे.
अज्ञात लिंकवर क्लिक करु नका : सॅम पित्रोदा
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका असा सल्ला सॅम पित्रोदा यांनी दिला आहे. यासह आपल्या उपकरणांना हानी पोहोचवतील अशा मालवेअरबद्दल सतर्क राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तुम्हाला कोणत्याही अज्ञात ईमेल/मोबाईल क्रमांकावरून माझ्याबद्दल आलेले ईमेल किंवा मेसेज मिळाल्यास ते ओपन करु नका, त्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. असे केल्यास तुमच्या स्वतःच्या उपकरणांची सुरक्षितता धोक्यात येवू शकतो. (Sam Pitroda)
हेही वाचा :
- शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित
- गांधी भारताचा आत्मा, तर आंबेडकर मेंदू
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?