महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. सलवान मोमिका असे त्याचे नाव आहे. तो मूळ इराकी आहे. २०२३ मध्ये त्याने पवित्र कुराण जाळले होते. त्याच्या या कृत्याने जगभरातील मुस्लिम राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. काही ठिकाणी निदर्शने दंगली आणि अशांतता निर्माण झाली होती. स्टॉकहोम जिल्हा न्यायालयात त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. खटल्याचा निकाला गुरुवारी (दि.३० जानेवारी) होता.(salwan momika )
मात्र स्वीडिशमधील माध्यमांनी त्याची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. सलवान मोमिकाचा बुधवारी रात्री उशिरा होवस्जो, सोडरताल्जे येथे त्याच्या घरी मृतदेह सापडला. त्याच्यावर बंदुकीच्या गोळी झाडण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे कोर्टाने निकाल पुढे ढकलला.
सलवानने कुराणाविरोधात निदर्शनाला परवानगी मागितली होती. स्वीडिश पोलिसांनी भाषण स्वातंत्र्याचा हवाला देऊन त्याच्या निषेधास परवानगी दिली, परंतु तरीही त्याच्यावर आरोप दाखल करण्यात आले.(salwan momika )
दरम्यान, मोमिकाने कोर्टात, त्याची निदर्शने मुस्लिमांविरोधात नसून इस्लाम धर्माविरुद्ध होती. मला कुराणातील संदेशांपासून स्वीडनच्या लोकांचे संरक्षण करायचे होते, असा युक्तिवादात केला होता.
कोण होता सलवान मोमिका?
कुराण जाळण्याबद्दल, त्यावरील टिपण्या आणि वांशिक द्वेषाला उत्तेजन दिल्याचा आरोप सलवान मोमिकावर ठेवण्यात आला होता. स्टॉकहोम कोर्टात गुरुवारी सकाळी निकाल अपेक्षित होता. स्वीडिश मायग्रेशन एजन्सीने २०२३ मध्ये मोमिकाला देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तथापि, इराकमध्ये त्याच्याविरुद्ध धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे हकालपट्टी करण्यात आली नाही. एप्रिल २०२४ पर्यंत त्याला तात्पुरता निवास परवाना देण्यात आला.(salwan momika )
हेही वाचा :