Home » Blog » Abalal Rehman: चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादन

Abalal Rehman: चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादन

चित्रांच्या माध्यमातून वाहिली कलात्मक श्रद्धांजली

by प्रतिनिधी
0 comments
Abalal Rehman

कोल्हापूर : चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी ‘रंगबहार’च्यावतीने अभिवादन करण्यात आले. चित्रकार, प्राचार्य मनोज दरेकर यांनी पद्माराजे उद्यानातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. (Abalal Rehman)

राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार आबालाल रेहमान यांचा हा पुतळा कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. देशविदेशांत आबालाल रेहमान यांच्या कलाकृती गौरविल्या आहेत. कलाशाखेतील विद्यार्थ्यांनी आबालाल यांच्या कलाकृतींचा अभ्यास करण्याची गरज आहे, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. (Abalal Rehman)

स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील कलाकारांनी आबालाल रेहमान यांचा आवडत्या रंकाळा परिसराची चित्रे रेखाटून अनोखी कलात्मक श्रद्धांजली वाहिली. प्राचार्य अजेय दळवी यांनी प्रास्ताविक केले. विजय टिपुगडे यांनी आभार मानले.

यावेळी धनंजय जाधव, प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, माजी प्राचार्य सुरेश पोतदार,राहुल रेपे,उत्तम साठे, सुधीर पेटकर, सुरेश मिरजकर, बबन माने, सर्वेश देवरुखकर, शैलेश राऊत, मनीपद्म हर्षवर्धन, मानसी पळशीकर यांच्यासह कला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा :

‘पुष्पा’ होतोय मालामाल; रक्तचंदनाचा होईना लिलाव

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00