Home » Blog » Saif stabbed : कोटीच्या खंडणीसाठी हल्ला

Saif stabbed : कोटीच्या खंडणीसाठी हल्ला

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

by प्रतिनिधी
0 comments
Saif stabbed

मुंबई : प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता पुढे येत होत्या. मात्र हा हल्ला १ कोटीच्या खंडणीसाठी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Saif stabbed)

सैफ अली खानचे कुटुंबीय आणि कर्मचारी झोपेत असताना हा हल्ला पहाटे दोनच्या सुमारास झाला. सैफच्या घरी काम करणाऱ्या नर्स एलियामा फिलिप (वय ५६) ने ही भयानक घटना सांगितली आहे.

सडपातळ बांध्याचा, साधारण तिशीतील घुसखोर सैफचा चार वर्षांचा मुलगा जेह झोपला होता त्या बेडरूममध्ये घुसला. काठी आणि धारदार हत्याराचा धाक दाखवत त्याने फिलिपकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. तिने प्रतिकार केला असता त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात तिच्या मनगट आणि हाताला दुखापत झाली. झटापट आणि गोंधळामुळे आया जुनूला जाग आली. तिने अलार्म वाजवला. त्यामुळे सैफ अली खान आणि करीना कपूर खान घटनास्थळी धावले. (Saif stabbed)

कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सैफ हल्लेखोराच्या दिशेने धावला. हल्लेखोराने त्याच्यावर वार केले. सैफच्या मानेवर, खांद्यावर, पाठीवर आणि मनगटावर वार करण्यात आले. त्यात तो गंभीर जखमी झाला. या झटापटीत गीता नावाची आणखी एक महिला जखमी झाली. आणखी लोक जमतील, या भीतीने हल्लेखोराने पळ काढला. वांद्रे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Saif stabbed)

उपनिरीक्षक सूरज इरकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुमारे ५’५ इंच उंच असल्याचे समजते. त्याने गडद कपडे आणि टोपी घातली होती.

सीसीटीव्ही फुटेज मिळाले

या हल्लेखोराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. आपत्कालीन जिन्यावरून येऊन तो घरात शिरला असावा, त्यानंतर तो या जिन्यावरूनच परत गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या जिन्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत संशयिताचे चित्रण मिळाले आहे. संबंधित संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00