63
मुंबई : प्रतिनिधी : चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी (दि.२१ जानेवारी) लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तो घरी परतला. सैफने पांढरा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. परतल्यानंतर त्याने घरातच फेरफटका मारला. त्याच्याभोवती आता अतिरिक्त सुरक्षारक्षक आहेत. घरात येण्यापूर्वी त्याने पापाराझींसाठी पोझ दिली. (Saif Returns)
आठवड्यापूर्वी सैफच्या घरात दरोडा घालण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने सैफवर खुनी हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच रात्री त्याला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Saif Returns)
हेही वाचा :