मुंबई/पुणे : प्रतिनिधी : सैफ अलीखानवर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही, असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेले आहे, त्यांचा कोणत्याही टोळीशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Saif Attack)
कोणत्याही टोळीने हा हल्ला केलेला नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट करत कदम म्हणाले, ‘सैफ अली खानला आधी कोणाकडूनही धमकी मिळालेली नाही. त्यासंदर्भात आजपर्यंत पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्याने कोणतेही सुरक्षा मागितलेली नाही, परंतु त्यांनी मागणी केल्यास आम्ही योग्य प्रक्रिया अवलंबू. सैफवर झालेल्या हल्ल्यामागे चोरी हाच एकमेव हेतू असल्याचेही कदम म्हणाले.(Saif Attack)
दरम्यान, सैफवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बांद्रा पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू केली आहे. घटनेला ३३ तास उलटून गेल्यानंतर या संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली नि सोडून दिले. ताब्यात घेतलेली व्यक्ती मूळ आरोपी नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. (Man released)
सैफ अलीच्या अपार्टमेंटमधील आपत्कालीन जिन्यावरून उतरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेला संशयित आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितात साम्य आहे. मात्र पोलिसांनी अद्याप तसे जाहीर केलेले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पोलीस चौकशी करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जो संशयित होता त्याच्याकडे एक बॅग होती. तशीच बॅग ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे मिळाली आहे. (Saif Attack)
क्राईम ब्रँचचे डीसीपी दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ताब्यात घेतलेल्या संशयितावर यापूर्वी घरफोडी, घरात जबरदस्तीने घुसून चोरी केल्याचे गुन्हे आहेत. या संशयिताचा सैफ अली खान प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी तीन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचीही चौकशी सुरू आहे. (Saif Attack)
सैफ अलीच्या मुलांची केअरटेकर एलियामा फिलीप यांनी गुरुवारी पोलिसांना हल्लेखोराचे वर्णन सांगितले होते. हल्लेखोराचे वय ३५ ते ४० असून त्याने शर्ट घातला होता. तसेच डोक्यावर काळी टोपी होती. केअरटेकरने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणेच संशयित सीसीटीव्हीत दिसला होता. एलियामाने पोलिसांना दिलेल्या जवाबात सांगितले आहे की, १५ जानेवारी रात्री मुलांना जेवण देऊन त्यांना झोपवले होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर बाथरुममधून बाहेर आला. सैफचा मुलगा जेहच्या बेडकडे निघाला. मी मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली असता हल्लेखोराने हत्यार दाखवत धमकी दिली. एक कोटी रुपयांची मागणी केली. मुलांच्या खोलीतील गोंधळाचा आवाज ऐकून सैफने मुलांच्या खोलीत धव घेतली. सैफने मुलांचा आणि केअरटेकरचा बचाव करण्याचा प्रयत्न करताच हल्लेखोराने हेक्सा ब्लेडने सपासप सहा वार केले. सैफच्या मदतीला आलेल्या तैमूरची केअरटेकर गीताही हाणामारीत जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोराने पळ काढला.
हल्लेखोराने एक वार मणक्याजवळ केल्याने मणक्याजवळ मोठी जखमी झाली होती. डॉक्टरांनी मणक्याजवळ घुसलेला हेक्सा ब्लेडचा तुकडा शस्त्रक्रिया करुन काढला. त्यामुळे सैफवरील धोका कमी झाला असून त्याची तब्येत सुधारत आहे. या घटनेने सैफचे कुटुंब हादरले आहे.
Maharashtra: Mumbai Crime Branch DCP Datta Nalawade and senior officials visited Bandra Police Station to interrogate the suspect pic.twitter.com/fadGSI61mb
— IANS (@ians_india) January 17, 2025
हेही वाचा :
कोटीच्या खंडणीसाठी हल्ला