Home » Blog » Saif Ali Khan सैफवरील हल्ल्याच्या निमित्ताने

Saif Ali Khan सैफवरील हल्ल्याच्या निमित्ताने

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात शंभर शब्दातील संपादकीय टिपणी.

by प्रतिनिधी
0 comments

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार किंवा त्याला आलेल्या धमक्या, बाबा सिद्दीकी यांची हत्या यापाठोपाठ सैफ अली खानवर (Saif Ali Khan)   झालेला हल्ला या घटना बॉलीवुडसाठी धोक्याचा इशारा मानल्या जातात. हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर मुंबईतील चित्रपटसृष्टी अस्थिर करण्याचा डाव आहे किंवा काय हेही तपासून पाहायला पाहिजे. मुंबई आता तुमच्यासाठी सुरक्षित राहिलेली नाही. तुम्ही उत्तर प्रदेशातल्या चित्रपटसृष्टीकडे चला किंवा अहमदाबादला स्थलांतरित व्हा, असा इशारा तर या घटनांद्वारे द्यायचा नाही नाही, असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. तो दुर्लक्षित करता येणार नाही. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. (Saif Ali Khan)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00