Home » Blog » रोहित शर्माला पुत्रप्राप्ती

रोहित शर्माला पुत्रप्राप्ती

पर्थमध्ये खेळण्याबाबत संभ्रम कायम

by प्रतिनिधी
0 comments
Ritika Sajdeh facebook

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शनिवारी मुलाला जन्म दिला. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिता बनल्याची बातमी जगाला सांगितली. रोहित व रितिकाचे हे दुसरे अपत्य असून त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, पत्नीच्या प्रसुतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ येथील खेळण्याबाबत अनिश्चितता होती. आता तो पहिल्या कसोटीपूर्वी संघात रूजू होईल का, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. (Rohit Sharma)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00