मुंबई : प्रतिनिधी : ‘‘मस्साजोगचे भाजपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली,’’ असा सवाल केला. (Rohit pawar)
रोहित पवार म्हणाले, “देशमुखांच्या हत्येच्या संदर्भात आलेले फोटो पाहून महाराष्ट्र स्तब्ध झाला. कपडे काढल्याचे, छातीवर पाय ठेवून आरोपींनी सेल्फी काढले. त्यांनी संतोष देशमुखांवर लघुशंका करताना फोटो काढले आहेत. त्यांनी संतोष देशमुखांवर लघुशंका केली नाही; तर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लघुशंका केली आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. हे फोटो काल आपल्याकडे आले, पण दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फोटो आले असावेत. हे फोटो तुमच्याकडे असताना त्यांना एक धाडसी निर्णय घ्यावा असे का वाटले नाही? तुम्हाला मन आहे का, असा प्रश्न पडला आहे.” (Rohit pawar)
ते म्हणाले, “तुमच्याकडे दोन महिन्यांपूर्वी फोटो आले. आम्ही काल पाहिल्यानंतर आम्हाला झोपा लागल्या नाहीत. तुम्हाला दोन महिने झोपा लागतात. हे फोटो तुमच्याकडे असतानाही माणसुकी जपली पाहिजे, असे तुमचे मन तुम्हाला बोलले नाही. तुम्ही पक्ष जपताय, सरकार जपताय, मैत्री जपताय. पण फोटो असूनही माणुसकी जपत नाही, हे पाहून तुमचे पाय धरायला पाहिजेत,’’ अशी टीका रोहित पवार यांनी केली. (Rohit pawar)
रोहित पवार म्हणाले, “फडणवीसांना मला विनंती करायची आहे की तुमची मैत्री कचऱ्यात टाका. कराड हा राक्षसी प्रवृत्तीचा माणून धनंजय मुंडेंचा खास आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही धनंजय मुंडेंची पाठराखण करत आहात, आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राजीनामा घ्यायला पाहिजे.” (Rohit pawar)
पंकजा मुंडे यांनीही पुढे यायला पाहिजे. थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना चाबकाने मारले असते, असेही पवार म्हणाले, सर्व कायदेशीर गोष्टीकडे लक्ष देऊन आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सरकारने सांगितले पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले. (Rohit pawar)
हेही वाचा :
फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा